‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. १४ वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट फक्त ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर येणाऱ्या १२ डिसेंबरला थिएटरवर एक हजार आठवडे पूर्ण करणार आहे. आॅक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेला शाहरुख खान आणि काजोल यांचा हा चित्रपट आजही मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरवर लागलेला आहे. शाहरुखने चित्रपटाच्या १००० आठवड्यांबाबत शानदार सेलिब्रेशन करण्याची इच्छा दर्शवली होती. एका वर्तमानपत्रातील बातमीनुसार शाहरुख आणि काजोल हा खास क्षण सेलिब्रेट करण्यासाठी कपिल शर्माच्या कॉमेडी नाईटस् या शोमध्ये जाणार आहेत. शाहरुख आणि काजोल ३० नोव्हेंबरला या एपिसोडचे शूटिंग करणार असल्याचे कळते. कॉमेडी नाईटस्मध्ये अनेक वेळा सहभागी झालेल्या शाहरुखच्या मते, चित्रपटाचा १००० वा आठवडा सेलिब्रेट करण्यासाठीचा हा उत्तम मंच आहे.
कॉमेडी नाईटस्मध्ये शाहरुख-काजोल
By admin | Published: November 20, 2014 12:33 AM