मराठी कलाविश्वातील महागुरु या नावाने विशेष लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सचिन पिळगांवकर(Sachin Pilgaonkar). उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्थान मिळवणाऱ्या सचिनची लेकही कलाविश्वात सक्रीय आहे. एकुलती एक या चित्रपटातून श्रिया पिळगावंकरने (Shriya Pilgaonkar) कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे श्रियाने मराठीसह हिंदी चित्रपट, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच श्रियाने मायापुरी मॅगझीनला एक मुलाखत दिली. यामध्ये तिने शाहरुख खानविषयी (Shahrukh Khan) भाष्य केलं. शाहरुखने श्रियाला दिलेला एक सल्ला आजही ती फॉलो करत असल्याचं तिने सांगितलं.शाहरुखच्या फॅन या चित्रपटातून श्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावेळी किंग खानने श्रियाला एक सल्ला दिला होता. हा सल्ला आजही श्रिया फॉलो करते.
'वेब विश्वात कितीही बिझी झालीस. तरीदेखील पुस्तकं वाचणं कधीच सोडू नकोस', असा शाहरुखने तिला सल्ला दिला होता. शाहरुखला स्वत: पुस्तक वाचायला विशेष आवडतात.
दरम्यान, मिर्झापूर या वेब सीरिजमध्येही श्रिया झळकली आहे. या सीरिजच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली. श्रिया अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती, दिग्दर्शक आणि गायिकादेखील आहे. श्रियाला स्विमिंगची विशेष आवड असून तिने अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपदही पटकावलं आहे.
श्रियाने मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. श्रिया ‘एकुलती एक’(Ekulti Ek), ’अन प्लस उन’(Un Plus Une), ’फॅन’(Fan), ’जय माता दी’ (Jai Mata Di),’हाउस अरेस्ट’(House Arrest), ‘भागड़ा पा ले’ (Bhagra Paa Le), ‘कादन’(Kaadan), ’13 मसूरी’ (13 Mussoorie),’मिर्झापुर’(Mirzapur), ‘बीचम हाउस’(Beecham House), ‘मर्डर इन गोंडा’(Murder in Agonda), ‘द गोन गेम’(The Gone Game), ’क्रेकडाउन’(Crackdown), ‘गिल्टी माइंड’(Guilty Minds) यामध्ये झळकली आहे.