मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी (shahrukh khan) जरा विशेष ठरलं आहे. मागच्या २-३ वर्षांमध्ये शाहरुखचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करत नव्हते. परंतु, २०२३ या सरत्या वर्षाच्या शेवटी त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिस दणाणून सोडत आहे. या वर्षात लागोपाठ त्याचे तीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे १९ वर्षांपूर्वी सुद्धा शाहरुखने अशीच कमाल केली होती. २००४ मध्ये त्याचे एकाच वर्षी ३ सिनेमा रिलीज झाले होते.
२०२३ मध्ये शाहरुखचा 'डंकी', 'जवान' आणि 'पठाण' हे तीन सिनेमा रिलीज झाले. विशेष म्हणजे हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर नेटकरी त्यांची तुलना २००४ मधील त्याच्या सिनेमांशी केली आहे. २००४ मध्ये त्याचे 'वीर जारा', 'मैं हूँ ना' आणि 'स्वदेस' हे तीन सिनेमा रिलीज झाले होते.
दरम्यान, २००४ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमांपैकी त्याचे दोन सिनेमा सुपरहिट झाले. तर एक सिनेमा सरासरी चालला. तसंच २०२३ मध्ये सुद्धा झालं. २००४ मध्ये 'वीर जारा' आणि 'मैं हूँ ना' हे दोन सिनेमा ब्लॉकबस्टर ठरले होते. तर, 'स्वदेस' सरासरी चालला होता. तसंच २०२३ मध्ये जवान, पठाण हिट झाले तर, डंकी सरासरी चालला. त्यामुळे सध्या नेटकरी २०२३ आणि २००४ या दोन वर्षांची तुलना करत आहेत.