Join us

शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 12:52 IST

Jawan : 'जवान' चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेला एक अभिनेता खऱ्या आयुष्यात ‘जवान’ आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

दमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला जवान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. शाहरुख या चित्रपटात पोलीस आणि सैनिक अशा दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेला एक अभिनेता खऱ्या आयुष्यात ‘जवान’ आहे. भूटानी अभिनेता सांगे याने भूटानी सेनेत नोकरी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सांगे अभिनेता बनण्याआधी सेनेत कार्यरत होता. पण बॉडी बिल्डिंग आणि मॉडेलिंगसाठी त्याने सेनेतील नोकरी सोडली. बॉडी बिल्डिंग क्षेत्रात त्याचं मोठं नाव आहे. तो मिस्टर भूटान या स्पर्धेचा विजेता होता. याबरोबरच त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. जवान आधी सांगे ‘रोहिंग्या’, ‘सिंगे’ या चित्रपटांत झळकला आहे. पण, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात त्याला पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर त्याचं नशीबच पालटलं. एका मुलाखतीत सांगेने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा कधी विचारच केला नसल्याचं सांगितलं होतं.

"वडील वारले की केस कापावे लागतात", नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

“मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा कधीच विचार केला नव्हता. याबाबत काही प्लॅनिंगही केलेलं नव्हतं. पण, सलमान सरांमुळे मला चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर मग मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार केला. अभिनेता बनणं माझं स्वप्न नव्हतं. मी चुकून या क्षेत्रात आलो,” असं सांगे म्हणाला होता.

लग्नानंतर प्रियांका चोप्राच्या प्रेमात वेडा झाला होता अक्षय कुमार, पत्नी ट्विंकल खन्नाला कळलं अन्...

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशात ७५ कोटी तर जगभरात तब्बल १२९ कोटींची कमाई केली. शाहरुखबरोबर ‘जवान’मध्ये दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खाननयनतारा