किंग खान शाहरुख आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. शाहरुखने खूप संघर्षानंतर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं, आज या सुपरस्टारचे फक्त देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. शाहरुख हा अत्यंत कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. आपल्या पत्नी आणि मुलांंवर ज्या पद्धतीनं प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो यावरुन तो उत्तम पती आणि उत्तम वडील असल्याचं स्पष्ट होतं. अलिकडेच शाहरुखच्या फोनमधील वॉलपेपरवरचा फोटो दिसला. तो फोटो पाहून सर्वांनी अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
नुकतंच शाहरुखच्या हातात असलेल्या फोनने सर्वांचं लक्ष वेधलं. शाहरुखच्या हातात असलेल्या मोबाइलवरच्या वॉलपेपरवरचा फोटो पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला. शाहरुख खानच्या फोन वॉलपेपरवर पत्नी गौरी खानचा फोटो नाही. मोठा मुलगा आर्यन आणि लाडकी लेक सुहाना यांचाही फोटो नाही. तर तो एका खास व्यक्तीचा फोटो आहे. शाहरुखच्या मोबाईलवर सर्वात छोटा मुलगा अबराम खानचा फोटो आहे. शाहरुखचं त्याच्या धाकट्या लेकावर प्रचंड प्रेम आहे.
अबराम 11 वर्षांचा आहे. सध्या तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अलिकडेच त्याच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अबराम याने ख्रिसमस या विषयावर परफॉर्मन्स केला. लाडक्या लेकाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख पोहचला होता. या स्नेहसंमेलन सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.