Join us

Pathaan Advance Booking: रिलीजआधीच 'पठाण'ने कमावले करोडो, पहिल्याच दिवशी विकली गेली इतकी तिकिटं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 5:54 PM

Pathaan Advance Booking: अद्याप भारतात 'पठाण'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत.

Pathaan Advance Booking: शाहरुख खान, दीपिका पादुकोणचा 'पठाण' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होतोय. चित्रपट रिलीज होण्यास अजून 10 दिवस बाकी आहेत. मात्र, रिलीजआधीच या सिनेमानं हवा केली आहे. आता तर ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा समोर आला आहे. हा आकडा बघता 'पठाण' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, असं चित्र दिसतंय.'पठाण'चा बजेट सुमारे 250 कोटींचा आहे. सुपरहिट होण्यासाठी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला दुप्पट कमाई करावी लागले.

अद्याप भारतात चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहता हा चित्रपट विदेशी बॉक्स ऑफिसवर शाहरूखचा सिनेमा छप्परफाड कमाई करणार, असं दिसतंय.

रिपोर्टनुसार, UAE मध्ये आतापर्यंत 65 हजार डॉलर्स म्हणजेच 52 लाखांवर रुपयांची 4500 तिकिटे विकली गेली आहेत. शाहरूखच्या रईसने UAE मध्ये पहिल्या दिवशी साडेतीन मिलियन डॉलर्स (सुमारे 2.84 कोटी रुपये) कमावले होते.  'पठाण' रिलीज व्हायला आणखी 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा चित्रपट  रईसला मागे टाकणार, असं वाटतंय.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही 'पठाण'चं जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. अमेरिकेत दोन कोटींवर किमतीची 22 हजार 500 तिकिटे विकली गेली आहेत. जर्मनीत पहिल्याच दिवशी 4500 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.   लोकांनी रिलीजपूर्वी वीकेंडसाठी 9000 तिकिटे खरेदी केली आहेत. आत्तापर्यंत जर्मनीत पठाणने 1.32 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोण