बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट चित्रपट गृहात आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट येण्याअगोदर शाहरुखवर टीका झाल्या. चित्रपट न चालू देण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. पण, तरीही हा चित्रपट जोरदार चालला. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खानचा हा चित्रपट आला आहे. शाहरुखचे करिअर संपले आहे आणि त्याचे चित्रपट चालत नाहीत,अशा चर्चा सुरू होत्या. पण 'पठाण'च्या यशाने हा मुद्दा चुकीचा ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. शाहरुख खानने पठाणच्या प्रदर्शनापूर्वीच निर्णय घेतला होता की तो या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. मात्र आता हा चित्रपट सुपरहिट झाल्याने या आनंदाच्या निमित्ताने 'पठाण' चित्रपटा संदर्भात पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेला शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही उपस्थित होते. यादरम्यान शाहरुखने आपल्या करिअरबद्दल खुलासे केले. 'जेव्हा त्याचे चित्रपट चांगले चालत नव्हते तेव्हा त्याने व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या करिअरबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला - जेव्हा लोक म्हणाले की माझे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा मी जेवन बनवण्यास शिकायला सुरुवात केली. मला वाटलं चला एक रेस्टॉरंट सुरु करूया. या प्रवाहात तो इटालियन पदार्थ बनवायलाही शिकला होता, असंही शाहरुखने सांगितले.
'मी क्रमाने काही स्वयंपाक शिकला आहे. त्यांनी त्यांचा प्रयोग वाया जाऊ दिला नाही आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना स्वतःच्या हातांनी बनवलेली डिशही दिली. शाहरुख खानने गंमतीत सांगितले की, त्याने सिद्धार्थ आनंदला पिझ्झा देऊन लाच दिली होती. शाहरुख खानच्या या चित्रपटाने सिद्धार्थ आनंदही प्रसिद्ध झाले आहेत. हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील पठाण हा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
केवळ भारतातच नाही तर जगभरात पठाणबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 5 दिवसांत 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजुनही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने वाढ होत असून लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.