तेरी बातो मे ऐसा उलझा जिया! व्हॅलेंटाईन्सला शाहीद-क्रितीचा रोमान्स, रोबोटिक लव्हस्टोरीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 02:37 PM2024-01-10T14:37:11+5:302024-01-10T14:37:42+5:30

शाहीद कपूर आणि क्रिती सेननचा रोमान्स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Shahid Kapoor and Kriti Sanon romantic love story teri baato me aisa uljha jiya in theatres this valentines | तेरी बातो मे ऐसा उलझा जिया! व्हॅलेंटाईन्सला शाहीद-क्रितीचा रोमान्स, रोबोटिक लव्हस्टोरीची चर्चा

तेरी बातो मे ऐसा उलझा जिया! व्हॅलेंटाईन्सला शाहीद-क्रितीचा रोमान्स, रोबोटिक लव्हस्टोरीची चर्चा

बॉलिवूडमध्ये सध्या सिनेमांमध्ये त्याच त्याच जोड्या न घेता फ्रेश जोड्यांना प्राधान्य दिलं जात आहे. लवकरच येणाऱ्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमात विजय सेतुपति आणि कतरिना कैफची फ्रेश जोडी आहे. तर शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) ही देखील जोडी मोठ्या पडद्यावर येत आहे. यामध्ये दोघांची सिझलिंग केमिस्ट्रीही पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचं केवळ पोस्टर रिलीज झालं होतं. तर आज सिनेमाचं नाव आणि रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.

शाहीद कपूर आणि क्रिती सेनन मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' असं सिनेमाचं नाव आहे. येत्या व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने 9 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये शाहीद आणि क्रिती रोमँटिक झालेले दिसत आहेत. रोमकॉमवर आधारित हा सिनेमा असणार आहे. शाहीद आणि क्रितीने शॉर्ट व्हिडिओ शेअर करत सिनेमाची झलक दाखवली आहे. 'या व्हॅलेंटाईनला अनुभवा एक अशक्य प्रेमकहाणी! तेरी बातो मे ऐसा उलझा जिया...९ फेब्रुवारी 2024 ला रिलीज."

सिनेमात डान्स आणि रोमँटिक गाण्यांची मेजवानी असणार आहे. तसंच ही एक अशक्य लव्हस्टोरी आहे. शाहीद हा शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे जो रोबोटच्या प्रेमात पडतो. क्रिती यामध्ये रोबोट दाखवण्यात आली आहे. शाहीद आणि क्रितीच्या या सिनेमात धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे ज्येष्ठ कलाकारही असणार आहेत. अमित जोशी सिनेमाचं दिग्दर्शक आहेत.  
 

Web Title: Shahid Kapoor and Kriti Sanon romantic love story teri baato me aisa uljha jiya in theatres this valentines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.