Join us

शाहिद कपूरच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ने सहा दिवसांत कमावले ३० कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 14:53 IST

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ...

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने वेग घेतला आणि गत ६ दिवसांत ३० कोटींपेक्षा अधिक रूपयांचा गल्ला जमवला.ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी काही क्षणांपूर्वी ‘बत्ती गुल मीटर चालू’चे आकडे शेअर केलेत. 

पहिल्या दिवशी याचित्रपटाने ६.७६ कोटी कमावले. तर शनिवारी दुस-या दिवशी ७.९६ कोटी, रविवारी ८.५४ कोटी, सोमवारी ३.१६ कोटी, मंगळवारी २.९१ कोटी आणि बुधवारी २.६५ कोटी रूपयांचा बिझनेस केला़ अशाप्रकारे सहा दिवसांत चित्रपटाने ३१.९८ कोटी रूपये कमावलेत.‘पद्मावत’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने शाहिद कपूरने या वर्षीची सुरूवात केली होती. ‘पद्मावत’ने ३०० कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यामुळे त्याच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा होत्या. पण बॉक्सआॅफिसवर चित्रपटाची संथ वाटचाल सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. तेलगू भाषेतील ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. संदीप हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेक दिग्दर्शित करणार आहे. 

टॅग्स :बत्ती गुल मीटर चालूशाहिद कपूर