Join us

संजय लीला भन्साळींवरील हल्ल्याचा शाहिद कपूरने केला निषेध

By admin | Published: January 28, 2017 4:45 PM

'पद्मावती' चित्रपटात प्रमुख भूमिका बजावणा-या शाहिद कपूरने संजय लीला भन्साळींना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - 'पद्मावती'च्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये मारहाण झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करण्याच निर्णय घेतला असून ते व संपूर्ण क्रू मुंबईत परतला आहे. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत सिनेमाचे शूटिंग जेथे सुरू होते त्या जयगड किल्ल्यावर हल्लाबोल करत भन्साळी यांनाबी मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे भन्साळी दु:खी झाले असून राजस्थानमध्ये पुन्हा कधीच शूटिंग करणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. संपूर्ण बॉलिवूडनेही भन्साळी यांना पाठिंबा दर्शवत या हल्ल्याचा निषेध केला आहे. 
(पद्मावतीच्या सेटवर राडा, भन्साळींना मारहाण)
  •  
 
दरम्यान 'पद्मावती' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणा-या अभिनेता शाहिद कपूरनेही या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे. ' कोणत्याही प्रकारची हिंसेला स्थान नाही. घडलेल्या या प्रकारामुळे मला मोठा धक्का बसला आहे. संजय लीला भन्साळी हे एक असे दिग्दर्शक आहेत, ज्यांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटेल. पद्मावती पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजेल ' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.