बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरने आपला आगामी सिनेमा 'जर्सी'चे उत्तराखंडमधील शेड्यूल पूर्ण केले आहे. अभिनेताने याची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली, यात त्याने उत्तराखंड सरकाराचे आभार मानले आहेत.
शाहिद कपूरने ट्विट करत लिहिले आहे, ''जर्सीचे उत्तराखंडमधील शेड्यूल पूर्ण झाले आहे. मी उत्तराखंड सरकारचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला राज्यातील अनेक सुंदर ठिकाणी चित्रपटाचे शेड्यूल सुरक्षितपणे शूट करू दिले. आम्ही ते यशस्वीरित्या पूर्ण केले.''
शाहिदने मानधनात केली होती कपातमिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूरने मेकर्सची झालेली आर्थिक अडचण लक्षात घेत आपल्या मानधनातून 8 कोटी कमी केले होते. शाहिद आता जर्सीसाठी 25 कोटींचे मानधन घेणार आहे. प्रॉफीट शेअरची अट अजूनही कायम आहे. गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती. भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. आता हिंदीत हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. ‘जर्सी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत. दिग्दर्शक गौथम हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.