Join us

रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

By ऋचा वझे | Updated: March 3, 2025 13:18 IST

काय म्हणाले संदीप रेड्डी वांगा?

संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने हिंदीतही दोन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. आधी शाहिद कपूरचा 'कबीर सिंह' आणि दुसरा रणबीर कपूरचा 'ॲनिमल'. दोन्ही सिनेमांवर टीकाही झाली होती. कारण हिंसा, रक्तपात, अत्याचार अशा गोष्टी यामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. तरी प्रेक्षकांनी दोन्ही सिनेमांना प्रतिसाद दिला आणि दोन्ही सुपरहिट झाले. पण तुम्हाला माहितीये का रणबीरच्या 'ॲनिमल' सिनेमात शाहिद कपूर कबीर सिंहच्या रुपात कॅमिओ करेल असा प्लॅन होता?

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी नुकताच खुलासा केला. त्यांनाी मुलाखतीत विचारलं गेलं की ॲनिमल मध्ये रणबीर कपूरचा डॉक्टर म्हणून कबीर सिंह असता तर? यावर ते म्हणाले, "मी हा फक्त विचार नव्हता केला तर मी खरंच तसं करणार होतो. मी टीमसोबत चर्चाही केली होती. सगळ्यांनाच ही कल्पना आवडली होती. आणखी जास्त १०० कोटी मिळतील असं सगळे म्हणाले. दिल्लीत शूट करताना मला सुचलं की कबीर सिंह चीफ डॉक्टर असेल जो अंतिम निर्णय घेणारा आणि एकदम रागीट असेल. सिनेमात रणबीरही जरा रागीट, वेडा आहे त्याला तोडीस तोड डॉक्टर कबीर सिंहच होता. त्यामुळे कबीर सिंहला आणायचं ठरलं होतं."

का मागे घेतली ही कल्पना?

ते म्हणाले,"मला नंतर वाटलं की कॅमिओ मुळे सिनेमावर परिणाम व्हायला नको. आपण वास्तव दाखवणार म्हणल्यावर ते एखाद्या प्रेझेंटेशन सीनसारखं वाटायला नको. केवळ मनोरंजनासाठी म्युझिक लावून कबीर सिंहला आणा, मी अशा द्विधा मन:स्थितीत होतो. दोन दिवस तर मी अगदी हे करायचंच आहे अशाच तयारित होतो. नंतर मी निर्णय मागे घेतला. कारण सिनेमात ती चर्चा फार गंभीर असणार होती. डॉक्टर त्याला सांगतात की तुझं हृदय बंद पडतंय, फुप्फुसं निकामी झालीत, किडनी निकामी झाली. हेच जर कबीर सिंहने त्याला  सांगितलं असतं तर ते फारच मजेशीर वाटलं असतं. ती चर्चा खरी वाटलीच नसती तर मी सिनेमात फिल्मी कॅरेक्टरच आणलं असतं."

टॅग्स :सिनेमाकबीर सिंगशाहिद कपूररणबीर कपूरबॉलिवूड