बॉलिवूडचा ‘किंग आॅफ रोमान्स’ शाहरुख खान याला कधी चिडलेलं पाहिलंय का? नाही ना..तरी त्याच्यावर बी टाऊनमध्ये ‘अॅरोगंट स्टार’ असा टॅग लागलेला आहे. पण, फार कमी जणांना ठाऊक आहे की, तो एक जंटलमॅन आहे. त्या माहिती असणाऱ्या लोकांपैकी एक त्याची अनेक चित्रपटातील को-स्टार प्रिती झिंटा ही आहे. प्रिती त्याची खूप चांगली मैत्रीण देखील आहे. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटात शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्याने ‘दिल से’ च्या टीमला धन्यवाद देणारा व्हिडीओ सोशल साईट्सवर अपलोड केला. त्यात तो प्रितीचे नाव घ्यायचे विसरला. म्हणून त्याने प्रितीची माफी मागत तो व्हिडीओ पुन्हा एकदा पोस्ट केला.
का मागितली शाहरूखने प्रीतीची माफी?
By admin | Published: August 25, 2016 2:22 AM