Join us

Dunki: लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:09 IST

पठाण आणि जवाननंतर शाहरुख आणखी एक सुपरहिट देण्यासाठी तयार झालाय.

Dunki Teaser: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शाहरुखने त्याच्या वाढदिवशी डंकी टीझर रिलीज करत चाहत्यांना सरप्राईज दिलंय. पठाण आणि जवाननंतर शाहरुख आणखी एक सुपरहिट देण्यासाठी तयार झालाय. डंकीचं पहिलं टीझर खूपच इंटरेस्टिंग आहे. 

शाहरुख खानने नुकतंच सोशल मीडियावर 'डंकी'चं टीझर पोस्ट केलंय. ही चार जणांची गोष्ट आहे ज्यांना लंडनला जायचंय. शाहरुख यामध्ये हार्डी ही भूमिका साकारत आहे जो या चार जणांना लंडनला जाण्यासाठी मदत करणार आहे. टीझरच्या सुरुवातीला शाहरुख काही लोकांसह वाळवंटातून चालताना दिसतोय. तर दुरुनच एक शूटर गोळी चालवताना दिसत आहे. शाहरुख वाळवंटामार्गे परदेशात जात आहे. आता शाहरुखसह ते चार जण परदेशात पोहोचतात का ही चित्रपटाची कहाणी असणार आहे. 

शाहरुख सोबत तापसी पन्नी, विकी कौशल, अनिल ग्रोवर, विक्रम कोचर हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. थोडी कॉमेडी आणि थोडं फिल्मी असं हे टीझर आहे. 'डंकी'चा हा ड्रॉप 1 रिलीज करण्यात आलाय. शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानींच्या सिनेमात दिसणार आहे. 22 डिसेंबर ला 'डंकी' रिलीज होतोय.

टॅग्स :शाहरुख खानविकी कौशलतापसी पन्नूराजकुमार हिरानी