बॉलिवूडचा किंग शाहरुख खानबाबत (Shahrukh Khan) काल एक धक्कादायक प्रकार घडला. अमेरिकेत शाहरुखचा अपघात होऊन त्याला गंभीर दुखापत झाली. लॉस एंजिलिसमध्ये शूट सुरु असतानाच त्याचा अपघात झाला आणि त्याच्या नाकाला जबर मार बसला असं वृत्त आलं. तातडीने त्याला रुग्णालयात दाख करण्यात आलं होतं. शाहरुख रक्तबंबाळ झाल्याचंही समजलं होतं. मात्र तोच आज पहाटे शाहरुख मुंबईत परतला आणि अगदी फिट दिसत होता. मग शाहरुखचा अपघात झाला की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
शाहरुख खानच्या अपघाताची बातमी कळताच शाहरुखचे चाहते चिंतेत पडले होते. त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला असून सर्जरी करायला लागल्याचंही समजलं होतं. शाहरुखला तातडीने भारतात आणण्यात येणार असल्याची बातमी आली होती. गौरी खानही मन्नतवरुन रवाना झाली होती. आज पहाटेच शाहरुख मुंबई विमानतळावर दाखल झाला. एरवी पापाराझींना टाळणारा शाहरुख आज मात्र चेहरा न लपवता आला.त्याने ब्लू स्वेटशर्ट, लूझ पँट आणि डोक्यावर कॅप घातली होती. यावेळी तो अगदी फिट दिसत होता जसं काय त्याचा अपघात झालाच नाही. शाहरुखचा विमानतळावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रश्न विचारलेत. 'याचा तर अपघात झाला होता ना?','नाकावर साधं बँडेडही दिसत नाहीए','अपघाताची बातमी खोटी होती का?','बरं झालं किंग खान ठिक आहे आता मला झोप लागेल' अशा कमेंट्स चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
शाहरुख सध्या आगामी सिनेमा 'जवान' मुळे चर्चेत आहे. सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. जुलै मध्ये जवान रिलीज होणार होता मात्र व्हीएफएक्सचे काम आणखी बाकी असल्याने सिनेमा सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. साऊथ दिग्दर्शक अॅटलीने सिनेमा दिग्दर्शित केला आहे. शाहरुखसोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.