Join us

"बेटे को हात लगाने से पहले..." शाहरुखच्या 'जवान' चे डायलॉग लिहिणारा तरुण आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 10:17 AM

शाहरुखचा सिनेमातला हा डायलॉग खूपच गाजतोय.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) काल सगळीकडे रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने ६५ कोटींची कमाई करत रेकॉर्ड सेट केला. जवानच्या फर्स्ट लुक आणि ट्रेलरपासूनच सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिनेमा रिलीज झाल्यानंतर थिएटरमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. शाहरुख खानच्या एंट्रीला तर शिट्ट्या आणि डान्स करत चाहत्यांनी धिंगाणा घातला. शाहरुखचा सिनेमातला एका डायलॉग खूपच गाजतोय. 'बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर' या डायलॉगने चाहत्यांचं मन जिंकलंय. 'जवान'चे डायलॉग लिहिणारा तो चेहरा आहे तरी कोण?

'जवान' चे हिंदी संवाद लिहिणारा लेखक सुमित अरोरा मेरठचा आहे. 'दहाड' आणि 'गन्स अँड गुलाब' सिरीजच्या यशानंतर त्याला 'जवान' सारखा प्रोजेक्ट मिळाला. हा त्याचा पहिलाच हाय प्रोफाईल प्रोजेक्ट होता. या अनुभवाविषयी विचारल्यावर तो म्हणाला,'सिनेमासाठी संवाद लिहिणं फारच मजेशीर होतं. कारण मला शाहरुखचा स्टारडम डोक्यात ठेवून ते संवाद लिहावे लागणार होते. हे माझ्यासाठी आतापर्यंत सर्वात कठीण आणि मनोरंजक काम होतं.'

तो पुढे म्हणाला, 'तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की हे डायलॉग खुद्द शाहरुख खान म्हणणार आहे. त्याचं स्टारडम, उंची आणि प्रसिद्धी बघून हे ठरवावं लागतं. तसंच तमिळमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे अॅटली कुमारचा हा प्रोजेक्ट आहे. त्याचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोक्यात हिंदी फिल्म बनवायची कल्पना होती. तेव्हा सोबत काम करण्याचा आमचा विचार होता मात्र कोणतीच स्क्रीप्ट नव्हती. जेव्हा त्याच्याजवळ पटकथा आली तो माझ्याकडे आला. कोणीच त्याच्यासारखा वजनदार सिनेमा बनवत नाही. जवानच्या प्रवासाचा मी एक भाग आहे याचा मला आनंदच आहे.'

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खान