Join us

बॉलिवूडच्या या अभिनेत्याची चंद्रावर आहे जमीन, विकत नाही तर मिळालीय गिफ्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:00 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला एका महिलेनं चंद्रावरील जमीन गिफ्ट म्हणून दिली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने झिरो चित्रपटात अंतराळवीराची भूमिका साकारली आहे. त्यात त्याने मंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. मात्र खऱ्या आयुष्यात शाहरूखचं अंतराळाशी जवळचा संबंध आहे. शाहरूख खानची चंद्रावरील जमिनीत एक तुकडा आहे. त्यासाठी त्याला दरवर्षी लूनार रिपब्लिक सोसायटी एक सर्टिफिकेटदेखील देते.

जागरणच्या रिपोर्टनुसार विशेष बाब म्हणजे शाहरूख खानने ही जमीन स्वतः विकत घेतलेली नाही. त्याला ही जमीन गिफ्ट म्हणून मिळाली आहे. शाहरूखवर त्याचे चाहते भरभरून प्रेम करतात आणि तोदेखील त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो व त्यांच्यावर तितकेच प्रेम करतो.

शाहरूखची अशीच एक चाहती आहे जी ऑस्ट्रेलियन आहे. तिनेच शाहरूखला गिफ्ट म्हणून चंद्रावरील जमीन विकत घेऊन दिली आहे. या चाहतीला शाहरूख भेटला आहे. मेलच्या माध्यमातून तो या चाहतीच्या संपर्कात आहे. शाहरूखचे जगभरात असे लाखो कोटी चाहते आहेत जे त्याला असे गिफ्ट देत असतात.

शाहरूख खानने आपल्या वाढदिवसादिवशी घोषणा केली होती की तो लवकरच आगामी चित्रपटाबद्दल सांगणार आहे. शाहरूखने जवळपास एक वर्षापासून कोणता चित्रपट साईन केलेला नाही.

असं सांगितलं जातं की शाहरूख खान लवकरच एका सिनेमात झळकू शकतो. आता तो या चित्रपटाची घोषणा करतो, हे पाहणं कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा