बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याअगोदर हा चित्रपट वादात सापडला होता. शाहरुखच्या या चित्रपटाची अॅव्हान्स बुकिंग सुरू झाले आहेत, यातही या चित्रपटाने रेकॉर्ड मोडले आहेत.चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतील संपूर्ण थिएटर बुक केले आहे. एवढेच नाही तर रसिकांची क्रेझ पाहून या थिएटरने आपले नियमही बदलले आहेत.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट आता काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारीला तो चित्रपटगृहात दाखल होत आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र चाहत्यांनी आतापासूनच या चित्रपटाचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. शाहरुख खानच्या फॅन क्लबने चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी मुंबईतील संपूर्ण थिएटर बुक केले आहे. हे मुंबईचे गेटी थिएटर आहे जे खूप जुने आणि आयकॉनिक थिएटर मानले जाते. हे मुंबईतील सर्वात मोठे स्क्रीन थिएटर असल्याचेही सांगितले जात आहे. फॅन क्लबने सोशल मीडियावरही या संदर्भात माहिती दिली आहे.
शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लबने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केला आहे. '25 जानेवारीसाठी संपूर्ण थिएटर बुक केले असल्याचे यात सांगितले आहे. थिएटरचा पहिला शो दुपारी 12 वाजता सुरू होतो, पण फॅन्सच्या मागणीनुसार यावेळी थिएटरने पहिला शो सकाळी 9 वाजता ठेवला आहे. 25 जानेवारी रोजी थिएटर सकाळी 9 वाजता पहिला शो सुरू होणार आहे. फॅन क्लबने या चित्रपटासाठी 200 हून अधिक शो बुक केल्याचेही बोलले जात आहे. 25 जानेवारी रोजी देशभरातील फॅन क्लबचे सदस्य हा चित्रपट देशाच्या विविध चित्रपट गृहात एकत्र पाहणार आहेत.
'धमाकेदार खबर, मुंबईच्या ऐतिहासिक थिएटर गेटीच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळी 9 वाजता चित्रपटाचा पहिला शो, असं या पोस्टमध्ये लिहिले आहे. शाहरुख खानची क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये वाढली आहे. ट्रेड पंडितही पहिल्याच दिवशी चित्रपटाचे जास्त बुकिंग होऊ शकते.