Join us

"बस झालं, खूप बोललास! KBCचे निर्माते माझ्या कानात ओरडायचे"; शाहरुखने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:19 IST

KBC मध्ये शाहरुखला नक्की काय कठीण गेलं?

'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय शोचं नाव घेतलं की आपसूकच अमिताभ बच्चन डोळ्यासमोर येतात. अनेक वर्षांपासून बिग बी हा शो होस्ट करत आहेत. कित्येकांची बिग बींना प्रत्यक्षात भेटण्याची इच्छाही पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर केबीसी(KBC)च्या तिसऱ्या सिझनचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan) केलं होतं. तेव्हा शाहरुखला शोचे निर्माते खूप ओरडायचे असा खुलासा त्याने नुकताच केला आहे.

शाहरुख खानने नुकतीच 'वर्ल्ड गवर्नमेंट समिट' मध्ये हजेरी लावली. यावेळी शाहरुखने केबीसीच्या आठवणी ताज्या केल्या. तो म्हणाला, "मला असं वाटायचं की माझ्यासमोर बसलेला स्पर्धक जिंकला पाहिजे. कारण हे स्पर्धक देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात. एक वेळ अशी यायची की मला त्यांची मदत करण्याची इच्छा व्हायची पण मी करु शकत नव्हतो. कारण निर्माते माझ्या कानात ओरडायचे की तुम्ही असं बोलू शकत नाही. आधीच खूप बोलला आहेस. शेवटचे 4 तास आणि २ प्रश्न खूपच कठीण असायचे."

शाहरुखला सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणारी फिल्म 'स्लमडॉग मिलेनियर'चीही ऑफर होती मात्र त्याने ती नाकारली होती. अनिल कपूरची भूमिका आधी त्याला विचारण्यात आली होती. यावर शाहरुख म्हणाला, "त्यामध्ये माझं पात्र चीटिंग करणार होतं जे मला पटलं नाही कारण मी आधीच शो होस्ट केला होता. म्हणून मी ती भूमिका सोडली."

शाहरुख खान सध्या जिकतेतिकडे चर्चेत आहे. ४ वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याचे बॅक टू बॅक 3 चित्रपट सुपरहिट झाले. सध्या तो आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सलमान खानसोबतच्या त्याच्या 'टायगर व्हर्सेस पठाण' ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :शाहरुख खानकौन बनेगा करोडपतीबॉलिवूडटेलिव्हिजन