Join us

Kishori Ballal Death : ‘स्वदेश’च्या ‘कावेरी अम्मा’ काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:27 IST

Swades Movie Fame Kishori Ballal Death : ‘स्वदेश’ या सिनेमात कावेरी अम्माची भूमिका साकारणा-या अभिनेत्री किशोरी बलाल यांचे निधन झाले.

ठळक मुद्देकिशोरी बलाल यांनी 1960 मध्ये फिल्मी करिअर सुरू केले होते.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या ‘स्वदेश’ या सिनेमात कावेरी अम्माची भूमिका साकारणा-या अभिनेत्री किशोरी बलाल यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री बेंगळुरूच्या एका रूग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या.अनेक कन्नड सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या किशोरी यांनी 2004 मध्ये प्रदर्शित ‘स्वदेश’मध्ये कावेरी अम्माची भूमिका साकारली होती. ‘स्वदेश’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी किशोरी यांच्या निधनाची बातमी शेअर करत, दु:ख व्यक्त केले.

किशोरीजी, ‘स्वदेश’मध्ये तुम्ही साकारलेली कावेरी अम्माची भूमिका कायम स्मरणात राहिल. दयाळू आणि प्रेमळ व्यक्ती म्हणून तुम्ही आठवणीत राहाल, असे त्यांनी लिहिले.किशोरी बलाल यांनी 1960 मध्ये फिल्मी करिअर सुरू केले होते. बॉलिवूडशिवाय साऊथच्या अनेक सिनेमांत त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. ... हा त्यांचा पहिला सिनेमा. काठी, हनी हनी, सूर्यकांति, अय्या, लफंगे परिंदे या सिनेमातही त्या झळकल्या. 

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानआशुतोष गोवारिकर