Join us

मधुर भांडारकर दिग्दर्शित सिनेमात शाहरुख खान साकारणार पोलीस अधिकारी? टायटल आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:31 IST

शाहरुख खान मधुर भांडारकर दिग्दर्शित आगामी सिनेमात पुन्हा एकदा पोलीस अधिकारी बनणार आहे (shahrukh khan)

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. शाहरुख गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमांमध्ये काम करतोय. शाहरुखला आपण विविध सिनेमांमध्ये आजवर कॉमेडी, गंभीर, रहस्यमयी भूमिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक खास गोष्ट अशी ती म्हणजे किंग खान आगामी सिनेमात पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं नाव खूप खास होऊन मधुर भांडारकर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. जाणून घ्या.

मधुर भांडारकर दिग्दर्शित सिनेमाचं टायटल खास

मधुर भांडारकर दिग्दर्शित सिनेमाचं नाव आहे 'इन्स्पेक्टर गालिब'. गेल्या अनेक वर्षांपासून मधुर भांडारकर या सिनेमावर काम करत आहेत. इतकंच नव्हे २०२२ साली मधुर भांडारकर यांचा 'बबली बाउन्सर' सिनेमा रिलीज झाला तेव्हाही मधुर यांनी 'इन्स्पेक्टर गालिब'विषयी अपडेट दिले होते. उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर ही कहाणी आधारीत होती. मधुर भांडारकर या सिनेमाचं शूटिंग सुरु करणारच होते तितक्यात कोवीड आला आणि संपूर्ण ठप्प झालं. 

शाहरुख खानसोबत बोलणी सुरु

दिग्दर्शक मधुर भांडारकर आता मात्र पुन्हा एकदा 'इन्स्पेक्टर गालिब' सिनेमाची जुळवाजुळव करायला सुरुवात करत आहेत. यासंबंधी ते शाहरुख खानशी बोलणी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. सर्व काही नीट झाल्यास मधुर भांडारकर पहिल्यांदा शाहरुखसोबत काम करताना दिसतील. याशिवाय शाहरुखही पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. 

टॅग्स :शाहरुख खानमधुर भांडारकर बॉलिवूड