पूजा सामंत - मुंबई
बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणून परिचित असलेल्या सुपरस्टार शाहरु ख खानने संपूर्ण सहारा स्टार हॉटेल आरक्षित केले आणि आपल्या आगामी ‘हॅपी न्यू ईयर’ या महत्त्वाकांक्षी सिनेमाचा पहिला लूक माध्यमांना अलीकडेच सादर केला. किंग खानने लौकिकाला शोभेल असा हा देखणा कार्यक्र म या वेळी आयोजला.
सिनेमातील प्रमुख कलाकार, दिग्दर्शिका फराह खान, संगीतकार विशाल-शेखर, अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोन, ज्ॉकी श्रॉफ, बोम्मन इराणी, सोनू सूद, विवान शाह, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्र आदींच्या उपस्थिती यावेळी होती. फराह खानने मध्यवर्ती कल्पना मांडत आपला सिनेमा ऐन दिवाळीत रसिकांचा आनंद द्विगुणित करेल, अशी ग्वाही दिली.
दुबईत होणा:या नववर्षाच्या पूर्वसंध्येस एका डान्स स्पर्धेसाठी भाग घेणारे सहा महाभाग प्रत्यक्षात कोटय़वधीच्या हि:याची चोरी कशी करतात, ह्या धाग्यास मनोरंजनाची झणझणीत फोडणी दिली गेलीय. किंग खानच्या फिल्मी कारकिर्दीला यंदा 25 वर्षे पूर्ण होता आहेत, त्याबद्दल खुदा आणि आपले चाहते, चित्रपट व्यवसायातील फरहा खानसारखे सहृदय यांचे बादशाह खानने आभार मानले. जीवनात यश-अपयश पाठशिवणीचा खेळ खेळत असतात, म्हणून निराश होऊ नय़े ह्या चक्र ातून कुणाचीही सुटका नाही़ जो प्रयत्न करीत राहतो, तो लूझर नाही तर विनर ठरतो, असा सकारात्मक संदेश ह्यातून मिळेल .
खान स्टार्समधून विस्तव जात नसल्याच्या बातम्या ह्या तशा जुन्याच. मात्र शाहरुखच्या ह्या नव्या सिनेमाच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात आली, ती म्हणजे खानावळीतल्या हीरोमध्ये समझोत्याची भावना निर्माण होऊ पाहतेय. किंग खानने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेन्टमध्ये म्हटले की, आमचाही सिनेमा सलमानच्या ‘किक’सारखा चालो, ‘पीके’ (आमीर खानचा आगामी चित्रपट)ला यश मिळो! समझोता एक्स्प्रेसच्या ह्या चित्रत भर पडली, कारण सलमान खानने देखील टि¦टरवर टि¦ट करीत त्याला ‘हॅपी न्यू ईयर’चा ट्रेलर आवडल्याची कबुली दिलीय! सलमानच्या या सकारात्मक खेळीबद्दल काय भावना आहेत, हे किंग खानला कळले नाही; पण फराह खानला मात्र स्वर्ग दोन बोटं उरला आहे.