Join us

‘हा’ अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’; सोनी पिक्चर्सनं शेअर केला टीझर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 10:20 IST

Shaktimaan : अभिनेता मुकेश खन्ना यांची शक्तिमान ही भूमिका घराघरांत पोहोचली आहे. तर आता शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

९० च्या दशकातील ‘शक्तिमान’ हा सुपरहीरो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय प्रेक्षक मोठ्या पडद्यावर या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता मुकेश खन्ना यांची शक्तिमान ही भूमिका घराघरांत पोहोचली आहे. तर आता शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने ‘शक्तिमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. तर ही भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न प्रेक्षकांसमोर आहे. मुकेश खन्ना यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मुकेश खन्नासोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता दिसत आहे. मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’चा टीझर शेअर केला होता.मुकेश खन्ना झाले होते शक्तीमान१९९७ ते २००० पर्यंत शक्तीमान दूरदर्शनवर आपल्या भेटीला यायचा. मुकेश खन्ना शक्तीमानची भूमिका साकारत होते. या शोमध्ये मुकेश खन्ना यांनी पंडित विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री यांचीही भूमिका साकारली होती, जे पत्रकार होते. यासोबतच वैष्णव महंत यांनी गीता विश्वास यांची तर सुरेंद्र पाल यांनी तामराज किलविशची भूमिका साकारली होती.

टॅग्स :बॉलिवूड