Join us

'गरमी वाढवू का..?', 'उतरन' फेम टीना दत्ताचे टॉपलेस फोटोशूट पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:17 IST

अभिनेत्री टीना दत्ता बोल्ड लूकमुळेही कायम चर्चेत असते.

'उतरन' आणि 'डायन' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री टीना दत्ता हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तुर्तास तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. मात्र आता ती पुन्हा लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. टीनाने स्वतः इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टॉपलेस दिसते आहे. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. पहिल्यांदाच टीना दत्ताला अशा अवतारात पाहून चाहते हैराण झाले आहेत.

टीना दत्ताने फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटो शेअर करत टीना दत्ताने लिहिले की, जर काही तक्रार नसेल तर मी थोडी गरमी वाढवू का? तसेच तिने म्हटले की, मी विचार केला की या नवीन महिन्यात थोडा बदल डिजर्व करतो. टीनाचे हे फोटोशूट खूप व्हायरल होत आहे.

टीना दत्ताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. टीना दत्ता सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 

टीना दत्ता मालिकांशिवाय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत चोखेर बाली चित्रपटात झळकली आहे. कित्येक वर्षांनंतर टीनाने हॉरर मालिका डायनमधून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.

टॅग्स :टिना दत्ता