Join us

प्लास्टिक सर्जरीमुळे 18 वर्षांत इतकी बदलली आहे शमा सिकंदर, सर्जरीमुळे उपस्थित झाले होते अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 10:31 IST

2003 मध्ये आलेला 'ये मेरी लाइफ है' या मालिकेतून शमा सिकंदरला ओळख मिळाली होती.

अभिनेत्री शमा सिकंदरचा म्युझिक व्हिडिओ 'हवा करदा' नुकताच रिलीज झाला आहे, त्यानंतर ती चर्चेत आहे.  2003 मध्ये आलेला 'ये मेरी लाइफ है' या मालिकेतून शमा सिकंदरला ओळख मिळाली होती. 'पूजा मेहता' च्या व्यक्तिरेखेत ती सलवार सूट परिधान करताना दिसली होती. शमा नैराश्यामुळे दीर्घकाळ ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहिली. जेव्हा ती परत आली, तेव्हा त्याच्या लूक्समध्ये बरेच बदलले झाले होते. असे म्हटले जाते की त्याने आपली प्लास्टिक सर्जरी केली आहे, तिच्या चेहरामध्ये झालेला बदल ही दिसतो आहे मात्र तिने ही गोष्ट नकारली आहे.

शमा  म्हणते तिने कोणतीच सर्जरी केलेली नाही. ती म्हणते की, तिने आपला आहार बदलला, ध्यानधारणा सुरू केली, ज्याचा परिणाम तिच्या चेहर्‍यावर दिसून येतो आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शमा म्हणाली की, 'मी प्लास्टिक सर्जरी केलेली  नाही. मला माहित नाही की लोक का म्हणतात की मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. ही फक्त एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. लोकांनी मला तेव्हा पाहिले जेव्हा मी मोठी होत होते. काही शारीरिक बदल होत  असतात. '

ट्रोलर्सवर भडकली शमा पुढे म्हणतो की 'मी योग्य वर्कआऊट  केले. मी योग्य टाएट घेतले आणि मेडिटेशन केले त्यामुळे माझ्या चेहऱ्यात बदल दिसतो आहे. मी डिप्रेशनमध्ये गेले असल्याने लोकांनी मला दीर्घकाल बघितले नाही. मी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली आहे परंतु त्याला सर्जरी म्हणू शकत नाही. लोक आपले मत व्यक्त करू शकतात परंतु मला ट्रोल करणे समजत नाही. '

शमाला अनेक सास बहू शोच्य ऑफर मिळतात, पण ती नकार देते. तिचा विश्वास आहे की ती एक आधुनिक मुलगी आहे. ती स्वत: ला सून म्हणून पाहत नाही. ती सध्या वेब शो करण्यावर भर देत आहे.

टॅग्स :शमा सिंकदर