'बाप -लेकी' मधलं प्रेमाचं नातं गाण्यातून उलगडणार 'शान'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:00 AM2018-12-20T08:00:00+5:302018-12-20T08:00:00+5:30

मुलीच्या आयुष्यातला पहिला सुपरहिरो,पहिला आदर्श आणि पहिला जवळचा खास मित्र हे  तिचे वडीलच असतात. अशाच एका बापलेकीच्या नात्याला आपल्या आवाजातून स्वरबद्ध करणार आहे गायक शान.

Shan will explain relation between father and daughter in this song | 'बाप -लेकी' मधलं प्रेमाचं नातं गाण्यातून उलगडणार 'शान'

'बाप -लेकी' मधलं प्रेमाचं नातं गाण्यातून उलगडणार 'शान'

googlenewsNext
ठळक मुद्देशान हा 'वडील मुलीच्या' नात्यावर एक गाणं गाणार आहे

बाहेरून जितकं नाजूक आणि हळवं वाटणारं बाप-लेकी च नातं आतून तेवढचं भक्कम आणि अतूट असतं. वडिलांसाठी आपली मुलगी हि सर्वात जवळची असते. तिला नेहमी हसत,आनंदात, सुखात ठेवण्यासाठी वडील हे नेहमीच प्रयत्न करत असतात. प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी हि खरंतर गळ्यातला ताईतच असते. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तिच्या उत्तम आरोग्यासाठी तो नेहमीच काळजीत असतो. खरा तर हि काळजी तिच्यावरच्या असणाऱ्या प्रेमापोटी असते. मुलीलाही आपले बाबा सर्वात जास्त जवळचे असतात. मुलीच्या आयुष्यातला पहिला सुपरहिरो,पहिला आदर्श आणि पहिला जवळचा खास मित्र हे  तिचे वडीलच असतात. अशाच एका बापलेकीच्या नात्याला आपल्या आवाजातून स्वरबद्ध करणार आहे गायक शान. 

वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या भावनांमधून शान नेहमीच गाणी गात असतो. शान हा 'वडील मुलीच्या' नात्यावर एक गाणं गाणार आहे. हे गाणं व्हिडीओ पॅलेसच्या अल्बममधले असून शान आणि व्हिडिओ पॅलेस हे ह्या गाण्यामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.  

या गाण्याबद्दल शान म्हणाला ''नानुभाई जयसिंघानी यांच्यासोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की, मी व्हिडीओ पॅलेसच्या अल्बमचा एक भाग झालो आणि ह्याच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांसमोर नव्याने येत आहे. वडील आणि मुलगी हे नातं सगळ्यात जास्त स्पेशल असतं वडिलांना जितकी मुलीची माया असते काळजी असते तेवढीच माया तेवढीच काळजी मुलीचीही आपल्या वडिल्यांवर असते. लवकरच हे गाणं आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. मी ह्या गाण्याबाबत फार उत्सुक आहे ''

 

Web Title: Shan will explain relation between father and daughter in this song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shaanशान