पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियदर्शन दिग्दर्शित जिओ स्टुडिओज आणि वाइड अँगल क्रिएशन्सचा आगामी तमिळ चित्रपट अप्पाथा हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवडण्यात आला आहे. भारत सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ स्टेटच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २७ जानेवारीला मुंबईत फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समध्ये याची स्क्रिनिंग होणार आहे.
या चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना प्रियदर्शन सांगतात, या प्रतिष्ठित सोहळ्यात ओपनिंग फिल्म म्हणून अप्पथाची निवड होणे ही गौरवशाली बाब आहे आणि याचा आम्हाला गौरव वाटतो. ही साधी आणि सुंदर कथा माझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी माझे निर्माते जिओ स्टडिओज आणि वाईड क्रिएशन्स यांचे आभार मानू इच्छितो. या चित्रपटासाठी सहकार्य करणे आणि उर्वशी सारख्या अभूतपूर्व प्रतिभेसोबत तिच्या माईलस्टोन कारकीर्दीत, ७०० व्या चित्रपटासाठी काम करणे ही आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट मी पूर्वी केलेल्या कोणत्याही प्रयत्नांपेक्षा वेगळा आहे आणि प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.