Join us  

गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत शरद केळकर

By admin | Published: November 21, 2015 3:17 AM

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या व ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'संघर्षयात्रा' या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा कोण रंगवणार हे इतके

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या व ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'संघर्षयात्रा' या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा कोण रंगवणार हे इतके दिवस गुलदस्त्यात होते. पण आता हे गुपित उघड झाले असून, गोपीनाथ मुंडे यांची भूमिका अभिनेता शरद केळकर साकारणार आहे. मुंडे यांचा हा चरित्रपट असल्याने या चित्रपटात त्यांच्या कुटुंबातील सदस्यही येणार हे ओघाने आलेच. त्यानुसार त्यांची पत्नी प्रज्ञा मुंडे यांची भूमिका दीप्ती भागवत हिने साकारली आहे. त्यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम यांच्या व्यक्तिरेखा अनुक्रमे श्रुती मराठे व प्रीतम कांगणे यांनी रंगवल्या आहेत. प्रमोद महाजन यांच्या भूमिकेत ओंकार कर्वे; तर प्रवीण महाजन यांच्या भूमिकेत गिरीश परदेशी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी या चित्रपटाचे शीर्षकगीत गायले असून, साकार राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या भूमिकेबद्दल शरद म्हणतो, शूटिंगच्या वेळी मी जेव्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये शिरायचो, तेव्हा मी शरद केळकर असायचो आणि बाहेर पडताना मात्र गोपीनाथ मुंडे झालेला असायचो. अर्थात, याचे सर्व श्रेय आमचे मेकअपमन प्रदीप प्रेमगिरीकर यांना आहे. मेकअपचा वाटा ९० टक्के असून, माझ्या अभिनयाचा वाटा केवळ १० टक्के आहे.