Join us

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- "प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:08 IST

मराठी अभिनेते शरद पोंक्षेंनी 'छावा' सिनेमा पाहून त्यांची खास प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, sharad ponkshe)

विकी कौशलची (vicky kaushal) प्रमुख भूमिका असलेला 'छावा' (chhaava movie) सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. सिनेमा रिलीज होऊन दोन दिवस झाले असून प्रेक्षकांच्या खास प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अशातच मराठी अभिनेते शरद पोंक्षेंनी (sharad ponkshe) सोशल मीडियाच्या माध्यमातून 'छावा' पाहून खास प्रतिक्रिया दिली आहे. शरद पोंक्षे म्हणतात, "नमस्कार! मी आताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला. खूपच सुंदर सिनेमा बनवलाय. प्रत्येक हिंदुस्थानीने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा सिनेमा जरुर बघावा."

"आपलं रक्त सळसळतं. डोळ्यातून पाणी थांबत नाही. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट सोसले. त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सीमा पार केल्या. लक्ष्मण उतेकर साहेबांनी या सिनेमाला खूप सुंदर पद्धतीने चित्रित केलं आहे. मानलं पाहिजे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. सिनेमातील सर्व मराठी कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अनेक वर्षांनी एक उत्कृष्ट ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळाला."

"या सिनेमाचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच. ए. आर. रहमान यांचं बॅकग्राऊंड म्युझिक खूपच सुंदर. औरंगजेब शेवटी आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची इतक्या क्रुरपणे हत्या करतो ते पाहवत नाही. जिथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशव्यांसारखे महानायक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले. आणि सध्याची तरुण पिढी.. शिकायला पाहिजे आपण. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने, प्रत्येक हिंदुस्थानीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा सिनेमा आवर्जुन पाहावा. मी हात जोडून विनंती करतो की, आताच तिकीट काढा आणि छावा बघा."

टॅग्स :शरद पोंक्षे'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्ना