दिवंगत अभिनेते ऋषी कपूर(Rishi Kapoor)यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन'(Sharmaji Namkeen) OTT वर रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना ऋषी कपूर यांची आठवण येत आहे. सोशल मीडियावरही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट पाहून त्यांचे चाहते आणि कुटुंबातील सदस्यही भावूक होत आहेत. आता ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर(Ranbir kapoor) याने आपल्या कुटुंबाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना शेअर केली आहे.
रणबीर कपूरने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, त्याचे काका आणि अभिनेते रणधीर कपूर(Randhir Kapoor) यांना स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान झाले आहे. या आजारात माणसाची स्मरणशक्ती कमकुवत होते. रणधीर सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा रणधीर कपूरने आपल्या धाकट्या भावाचा 'शर्माजी नमकीन' चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना भावाची आठवण झाली. इतकेच नाही तर ऋषी कपूर आता या जगात नाहीत हेच रणधीर कपूर विसरले आणि चित्रपट पाहून झाल्यावर रणबीरकडे विचारणा केली, ऋषी कुठे आहे, त्याला फोन लाव.
रणधीर यांना ऋषींना फोन करायचा होतारणबीर कपूरने सांगितले की, रणधीर कपूरने यांनी रणबीरसमोर ऋषी कपूरच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. रणबीर म्हणाला, 'माझे काका रणधीर कपूर डिमेंशियाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, ऋषीने खूप चांगला अभिनेय केला. तो आता कुठंय, त्या फोन लावून देत.' विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत रणधीर यांनी दोन भाऊ ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांना गमावले आहे. आपले दोन्ही भाऊ गमावल्याने त्यांना जबर धक्का बसलाय.
भाऊ गमावल्याचा धक्कायापूर्वीही रणधीर कपूरने आपल्या भावंडांना गमावल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या वर्षीही टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शेअर केले होते, 'गेले वर्ष माझ्यासाठी खूप दुःखाचे होते. फक्त 10 महिन्यांत माझे दोन भाऊ मला सोडून गेले. मागील अडीच वर्षांत मी माझी आई आणि बहीण रितू नंदा यांनाही गमावले.