Join us

शर्मिला टागोर यांच्या बिकिनी शूटने उडाली होती खळबळ, नातं वाचवण्यासाठी केलं होतं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 10:54 AM

शर्मिला टागोर यांना त्यांच्या सुंदरतेसोबतच बोल्डनेससाठीही ओळखलं जातं. त्यांच्या बिकिनी शूटसंबंधी एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एकेकाळची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आणि मंसूर अली खान पतोडी यांच्या पत्नी शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ मध्ये झाला होता. आज त्या त्यांच्या ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडच्या अनेक यादगार सिनेमात कामे केली. त्यांच्या सुंदरतेचं कौतुक आजही केलं जातं. शर्मिला टागोर यांना त्यांच्या सुंदरतेसोबतच बोल्डनेससाठीही ओळखलं जातं. त्यांच्या बिकिनी शूटसंबंधी एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यावर शर्मिला टागोर यांनी सर्वच सुपरस्टारसोबत कामे केली. आणि अनेक सुपरहिट सिनेमांचा त्या भाग होत्या. यापैकीच एक सिनेमा होता 'इन इव्हिनींग इन पॅरिस'. या सिनेमात पहिल्यांदा शर्मिला यांनी बिकिनी सीन केला होता. हा सीन पाहून बॉलिवूडमध्ये धमाका झाला होता. इतकेच नाही तर त्यांच्या सीनमुळे संसदेतही गोंधळ झाला होता. हा सीन केल्यावर शर्मिला टागोर या बॉलिवूडमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या.

१९६८ मध्ये शर्मिला टागोर यांचं आणखी एक बिकिनी फोटोशूट समोर आलं होतं. हे फोटोशूट तिने ग्लोसी फिल्म फेअर मॅगझिनासाठी केलं होतं. या फोटोशूटनंतरचा एक किस्सा आहे. त्यावेळी शर्मिला यांचं मंसूर अली खान पतोडी यांच्यासोबत अफेअर होतं. त्याच दरम्यान सिनेमातील बिकिनी सीनमुळे त्या चर्चेत होत्या.

मुंबईत ठिक-ठिकाणी त्यांचे मोठे होर्डिंग्स लागले होते ज्यात शर्मिला बिकिनीत दिसत होत्या. अशातच शर्मिला यांना समजलं की, मंसूर अली खान पतोडी यांची आई त्यांना भेटण्यासाठी मुंबईत येत आहे. हे ऐकून शर्मिला हैराण झाल्या. शहरात लागलेले पोस्टर जर मंसूर अली खानच्या आईने पाहिले तर काय होईल याची त्यांना चिंता सतावत होती. त्या लग्नाला नकार तर देणार नाही ना? असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.

शर्मिला यांना काही समजत नव्हतं की काय करावं. मात्र, मंसूर अली खान पतोडी यांना शर्मिला यांच्या बिकिनी पोस्टर्समुळे काहीही समस्या नव्हती.  कारण त्यांना शर्मिला यांचं प्रोफेशन चांगलंच माहीत होतं. शर्मिला यांना काहीच सुचलं नाही तेव्हा त्यांनी निर्मात्याला फोन केला आणि शहरातील सर्व होर्डिंग काढायला सांगितले. अशाप्रकारे मंसूर अली खान यांच्यासोबतचं नातं टिकवून ठेवण्यासाठी शर्मिला यांनी शक्य ते प्रयत्न केले आणि त्यात त्या यशस्वीही ठरल्या. 

टॅग्स :शर्मिला टागोरबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स