Join us

सैफ अली खान आणि करिना कपूरच्या लग्नात खूश नव्हत्या शर्मिला टागोर, त्यांनीच सांगितले होते कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 7:27 PM

सैफ अली खान आणि करिना यांचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. त्यांच्या लग्नाला सैफ आणि अमृता सिंग यांची इब्राहिम आणि सारा ही मुलं देखील उपस्थित होती.

ठळक मुद्देशर्मिला टागोर यांनीच याविषयी एका मुलाखतीत कबुली दिली आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सैफ अली खान आणि करिना यांचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. त्यांच्या लग्नाला सैफ आणि अमृता सिंग यांची इब्राहिम आणि सारा ही मुलं देखील उपस्थित होती. पण या लग्नात सैफ अली खानची आई अभिनेत्री शर्मिला टागोर या खूश नव्हत्या.

शर्मिला टागोर यांनीच याविषयी एका मुलाखतीत कबुली दिली आहे. शर्मिला यांचे पती  मन्सूर अली खान पतौडी यांचे करिना आणि सैफ अली खानच्या लग्नाच्या एक वर्षं आधीच निधन झाले होते. त्याचमुळे शर्मिला टागोर यांना लग्नात उत्साहच नव्हता. शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी लग्नासाठी घालण्याच्या कपड्यांविषयी देखील काहीच ठरवलं नव्हत. एक जुनीच साडी मी लग्नात नेसले होते. 

टशन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करिनाने सांगितले होते की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिने मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करिना कपूर असं काही करतेय, यावर माझा विश्वास बसत नाही, असे सैफने म्हटले होते.'' शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफने लग्नासाठी प्रपोज केल्याचे करिनानं सांगितलं होतं. 

एका मुलाखतीदरम्यान करिनाने आपल्या लग्नाची गोष्ट सविस्तरपणे मांडली होती. तिने सांगितले होते की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफने मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं होतं, त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफने लगेचच ही गोष्ट मान्य केली होती.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरशर्मिला टागोर