संजय लीला भन्साळींची 'हिरामंडी' ही वेब सिरीज सध्या तुफान चर्चेत आहे. या भव्य वेब सिरीजद्वारे दिग्दर्शकानं OTT विश्वात पदार्पण केलं आहे. 'हीरामंडी' या मल्टीस्टारर वेब सीरिजमध्ये संजय लीला भन्साळींची भाची महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. ती म्हणजे शर्मीन सहगल. या वेबसीरिजमधील तिच्या 'आलमजेब' या व्यक्तिरेखेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. चला तर जाणून घेऊया शर्मीन सहगलला 'आलमजेब' भुमिकेसाठी किती मानधन मिळालं.
'हिरामंडी'मध्ये शर्मीन सहगलने मल्लिका जान म्हणजेच मनीषा कोईरालाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. एकीकडे इतर अभिनेत्रींना त्यांच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत असली तरी दुसरीकडे, संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मीन सहगलला मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं. आता अभिनेत्रीच्या मानधनाबाबत माहिती समोर आली आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, भन्साळींनी आपल्या भाचीला 35 लाख रुपये मानधन दिलं. TOI आणि News18 च्या रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी जवळपास 200 कोटी खर्च केले आहेत.
शर्मीनने 2019 मध्ये 'मलाल' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत मीझान जाफरी दिसला होता. यानंतर 2022 मध्ये तिचा ' अतिथि भूतो भवः' रिलीज झाला. याशिवाय तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. लवकरच ती 'हिरामंडी सीझन 2' मध्ये देखील दिसणार आहे. दुसऱ्या भागात ती आपल्या मुलाला जन्म देईल आणि स्वातंत्र्यासाठी लढताना पाहायला मिळेल.
'हिरामंडी'ची पटकथा ही 1940 च्या दशकात असलेल्या ब्रिटीश राजवटीतीली भारतावर आधारीत आहे. हिरामंडीत राहणाऱ्या वेश्यांवर आधारीत आहे. 'हिरामंडी' या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी आणि शर्मीन सहगल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या वेबसिरिजमधील कलाकारांच्या अभिनयाची, हीरामंडीच्या सेटची अन् कलाकारांच्या कपड्यांची प्रचंड चर्चा आहे.