Join us

Shatrughan Sinha : मी आर्यनला सपोर्ट केला पण शाहरूखने..., ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा ‘किंगखान’वर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:34 IST

Shatrughan Sinha is upset with Shah Rukh Khan: बॉलिवूडचे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा सध्या तरी ‘किंगखान’ शाहरूख खानवर नाराज आहेत. होय, एका ताज्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली.

Shatrughan Sinha is upset with Shah Rukh Khan: बॉलिवूडचे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) सध्या तरी ‘किंगखान’ शाहरूख खानवर  (Shah Rukh Khan) नाराज आहेत. होय, एका ताज्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. ड्रग्ज प्रकरणात  (Drugs Case) शाहरूखचा मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) याला अटक झाली होती. यावेळी बॉलिवूडच्या काही निवडक लोकांनी आर्यन व शाहरूखला उघडपणे पाठींबा दिला होता. यात शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर होते. त्यांनी आर्यनला पाठींबा देत एनसीबीवर ताशेरे ओढले होते. एनसीबी कुठल्याही पुराव्यांशिवाय आर्यनला त्रास देत आहे, अशा शब्दांत त्यांनी एनसीबीला सुनावलं होतं. गत आठवड्यात एनसीबीने आर्यनला क्लिनचीट दिली. या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘नेशन नेक्स्ट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शाहरूखवरची नाराजी बोलून दाखवली.

काय म्हणाले, शत्रुघ्न‘एक पालक या नात्यानं मी शाहरूखचं दु:ख समजून घेतलं. आर्यनचा मी सपोर्ट केला. मी तेव्हा योग्य होतं, तेच केलं. पण शाहरूखने   एका शब्दानंही माझे आभार मानले नाहीत. त्याने साधं एक थँक्यू कार्डही पाठवलं नाही. आर्यनला तुरुंगात पाठवण्याचा विरोध करणाऱ्यांमध्ये मी आघाडीवर होतो. माझी ती सवयच आहे. मी नेहमी सत्याची बाजू घेतो. मी तेव्हाही सत्याचीच बाजू घेतली. अन्याय होतोय, हे पाहून मी आवाज उठवला. शाहरूखचं म्हणाल तर त्याने ना माझे आभार मानले, ना थँक्यू कार्ड पाठवलं, असं शत्रुघ्न म्हणाले. 

तुम्ही शाहरूखशी बोलण्याचा प्रयत्न केला का? असं विचारलं असता, ‘नाही, अजिबात नाही. मी का त्याच्याशी बोलू? ते काम त्याने करायला हवं. मला त्याच्याशी बोलण्याची गरज काय?,’असं ते म्हणाले. आर्यन प्रकरणात शाहरूखने माझा सपोर्ट मागितला नव्हता, हेही त्यांनी स्पष्ट केलं.गेल्या आठवड्यात ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मात्र या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने त्याला क्लीनचीट मिळाली आहे. 

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाशाहरुख खानआर्यन खानबॉलिवूड