मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्यात पावलांवर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमी देशपांडे हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि तिने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. देशपांडे सध्या माझा होशील ना या मालिकेत सईची भूमिका साकारते आहे आणि तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तर मृण्मयी सध्या सारेगमपा लिटिल चॅम्प्स शोचे सूत्रसंचालन करते आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या देशपांडे बहिणी अभिनयाशिवाय बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत येत असतात. दरम्यान आता मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या व्हिडीओत बहिण गौतमीवर गंभीर आरोप केले आहेत.