पंजाबची कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिल (Shehnaaz Gill) बिग बॉस (Bigg Boss) शोमुळे घराघरात पोहचली. एकापेक्षा एक दमदार चित्रपट या अभिनेत्रीकडे येत आहेत. ती सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटात दिसणार आहे. पण आता अभिनेत्रीला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे ज्यात जॉन अब्राहम तिच्यासोबत असणार आहे.
शहनाज गिलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीला एक मोठा टी-सीरीज चित्रपट मिळाला आहे ज्यामध्ये जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि नोरा फतेही देखील तिच्यासोबत दिसणार आहेत. चित्रपटाचे नावही मनोरंजक आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाचे नाव '१००%' असे ठेवण्यात आले आहे. यातही १००% मनोरंजनाची आशा आहे. या चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट शहनाज गिलच्या करिअरमध्ये नक्कीच मोठी झेप घेईल.
निर्माता भूषण कुमार आणि अमर बुटाला यांनी जॉन अब्राहम, रितेश देशमुख, नोरा फतेही आणि शहनाज गिल स्टारर कौटुंबिक मनोरंजन चित्रपट १००% साठी हातमिळवणी केली आहे. एका मोठ्या भारतीय लग्नाच्या पार्श्वभूमीवर आणि गुप्तहेरांची क्रेझ असलेला हा साजिद खान चित्रपट विनोदी, अॅक्शन आणि गोंधळाने भरभरून मनोरंजनाचे आश्वासन देतो! या चित्रपटाचे शूटिंग २०२३ च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे आणि दिवाळी २०२३ मध्ये रिलीज होईल.