मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावतात. अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने नुकतेच सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले. शहनाजचा म्युझिक व्हिडीओ हा नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त तिनं मंदिराला भेट दिली आहे. म्युझिक व्हिडीओला चांगलं यश मिळावं यासाठी ती बाप्पापुढे नतमस्तक झाली आहे.
शहनाजनं अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शहनाज गिलचा नवीन म्युझिक व्हिडीओ 'धुप लगदी' रिलीज होताच लोकप्रिय झालं आहे. तिच्या या म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या म्युझिक व्हिडीओची विशेष गोष्ट अशी की, 'धुप लगदी' हे गाणं स्वत: शहनाजने गायलं आहे.
यावेळी शहनाजने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता, तर नारंगी रंगाची ओढणी घेतली होती. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे यावेळी मंदिरात गणपती बाप्पाचा फोटो आणि लाल रंगाची शाल देऊन शहनाजचं स्वागत केलं गेलं. दर्शनानंतर शहनाजने पापाराझींना मिठाईदेखील वाटली. शहनाजने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील सिद्धिविनायक मंदिरातील तिचा फोटो शेअर केला आहे. 'गणपती बाप्पा मोरया' असं कॅप्शन या फोटोला शहनाजने दिलं आहे.
शहनाज गिलनं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. शहनाज गिलने 'बिग बॉस 13' मधून चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले आहे. या शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत मैत्री झाल्यानंतर, ती त्याच्या खूप जवळ आली. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या वेळीही शहनाज गिल त्याच्यासोबत होती. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने ती पार कोलमडून गेली होती. मात्र, आता स्वतःला सावरत ती पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे.