Join us

Sherlyn Chopra : '19 एप्रिल रोजी मला अंडरवर्ल्डकडून धमक्या, शिल्पा शेट्टीचाही फोन'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 9:24 PM

Sherlyn Chopra : १४ ऑक्टोबर रोजी शर्लिन चोप्रा हिनं मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात खळबळजनक आरोप करत तक्रारीची नोंद केली होती.

ठळक मुद्देशर्लिन चोप्राने ट्विटरवरुन आपलं मत मांडताना घटनाक्रमचं दाखवला आहे. त्यानुसार, '19 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्रा यांनी मला माझ्या निवासस्थानी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून धमक्या दिल्या

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यावर प्रत्युत्तर देत आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिन चोप्रा हिला थेट कोर्टात खेचलं आहे. त्यानंतर, शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा कुंद्रा पती-पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. 

१४ ऑक्टोबर रोजी शर्लिन चोप्रा हिनं मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात खळबळजनक आरोप करत तक्रारीची नोंद केली होती. यात शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रावर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच फसवणुकीचीही तक्रार केली आहे. त्यानंतर, शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी बदनामीचा दावा दाखल केल्यानंतर शर्लिन चोप्राने ट्विट करुन पुन्हा आरोप केले आहेत. 

शर्लिन चोप्राने ट्विटरवरुन आपलं मत मांडताना घटनाक्रमचं दाखवला आहे. त्यानुसार, '19 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्रा यांनी मला माझ्या निवासस्थानी अंडरवर्ल्डच्या माध्यमातून धमक्या दिल्या, एवढेच नाही तर त्याच दिवशी त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनीही मला फोनवर धमकी दिली. त्यामध्ये, राज यांच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या बातम्या बाहेर आल्यास ते माझ्याविरोधात करोडो रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करतील, असे सांगण्यात आल्याचे शर्लिन चोप्राने म्हटले आहे. तसेच,  'तुम्ही एखाद्या कलाकाराचे लैंगिक शोषण करू शकत नाही, तिच्यावर बलात्कार करू शकत नाही. म्हणून, त्या महिलेने तुमच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करायचं ठरवलं, तर तुम्ही तिच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्याची धमकी देऊ शकत नाही, असेही शर्लिन चोप्राने म्हटलं आहे. तर, शर्लिनने 4 ऑक्टोबर 2021 रोजी पाठवण्यात आलेली क्रिमिनल इंटिमेशन नोटीसही शेअर केली आहे. मला अपेक्षितच होतं आणि माझ्या कायदेशीर नोटिसमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि इतरांना नमूद केल्याचंही तिने सांगितलं आहे. 

नोटीसमध्ये काय म्हटलंय

शर्लिन चोप्रानं केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहिन असल्याचं राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. शर्लिन केलेल्या आरोपांविरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आम्ही कोर्टात केला आहे, असंही वकिलांनी सांगितलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्रा हिला नोटिस धाडली असून त्यात तिनं केलेले आरोप खोटे, निराधार आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. समाजात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना बदनाम करण्यासाठी शर्लिन चोप्रानं असे खोटे आरोप केल्याचंही नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही शर्लिन चोप्रा विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला असल्याचंही वकिलांनी सांगितलं.  

टॅग्स :शर्लिन चोप्राराज कुंद्राशिल्पा शेट्टीबॉलिवूडपोलिस