शर्मन जोशी आणि शेफाली जरीवाला यांचा लघुपट 'आऊच २' प्रदर्शित झाला. वैभव मुथा यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या आणि शीतल भाटिया यांनी निर्मिती केलेल्या या १५ मिनिटांच्या चित्रपटात एक फसवणूक करणाऱ्या, टू - टायमर, सुदीपला एक विनोदी संयोगात उघड करण्यात आले आहे. त्याची पत्नी दीपू म्हणून, निधि बिष्त हिने आणि गर्लफ्रेंड तान्या म्हणून, शेफाली जरीवाला हिने भूमिका साकारलेला हा चित्रपट, एक विशिष्ट विवाहबाह्य संबंधाचा अंत कसा होतो, या विषयावर एक विलक्षण विनोद आहे.
मुंबईतील रात्री उशिरा रात्रीची पार्श्वभूमी असलेला, ‘आऊच २' ही, टू टाइमिंगवर एक सावधगिरीची कथा आहे. या चित्रपटाची सुरुवात, एका इष्कबाज सुदीप आणि त्याची गर्लफ्रेंड, तान्या हे दोघे कामावरून घरी परत येत असताना होते. तिला घरी सोडल्यानंतर, सुदीप गुपचूप तान्याला फोन करतो परंतु, जेव्हा त्याची पत्नी (जिचे नाव 'मम्मी जी‘ म्हणून जतन केले गेले आहे), त्या दरम्यान कॉल करते आणि त्याला पुन्हा उशीर झाल्याबद्दल तक्रार करते, तेव्हा तो नाराज होतो. तान्यासोबतचा कॉल अद्यापही होल्डवर असताना आणि तो पत्नी दीपूसोबतच्या कॉलवर रागारागाने बोलत असताना, गाडी चालवताना फोनवर बोलल्याबद्दल त्याला पोलिस अडवतात. त्याला हे समजण्यापूर्वी, ते दोन कॉल विलीन (मर्ज) होतात आणि सुदीपच्या विवाहबाह्य संबंधाच्या साहसास एक कर्कश आवाजासह थांबावे लागते.