Join us

शिलाँगमधील तरुण आयुष्यमानला भेटण्यासाठी हॉटेलात शिरले त्यानंतर काय घडले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:35 PM

आयुष्यमानने त्याच्या टीमला सांगितलं की तो मुलांना वाट पाहत उभं नाही करणार. त्याला लगेचच खाली जाऊन त्या मुलांना भेटायचं आहे. 

बॉलिवुड स्टार आयुष्यमान खुरानाने बॉलिवुडला 'आयुष्यमान खुराना जॉनर' असा एक नवा प्रकार देऊ करत सिनेमांच्या इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. आपल्या अनोख्या, क्वर्की, ठरलेल्या पठडी पलिकडली सिनेमांतून 'टॅबू' समजल्या जाणाऱ्या विषयांना वाचा फोडली आहे. 'भारतातील कंटेंट सिनेमांचा पोस्टर बॉय' समजल्या जाणाऱ्या आयुष्यमानची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे. अनुभव सिन्हाच्या आगामी 'अनेक' या सिनेमासाठी तो शिलाँगमध्ये चित्रिकरण करत होता. या दरम्यान आपल्या आवडत्या युथ आयकॉनला भेटण्यासाठी सुमारे 200 तरुण तो राहत असलेल्या हॉटेलात शिरले.

तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले, "त्या दिवशीचं चित्रिकरण संपल्यानंतर आयुष्यमान हॉटेलवर परतला आणि रात्रीच्या जेवणासाठी गेला. त्यानंतर साधारण 15 मिनिटांत शिलाँगमधील 200-250 कॉलेजतरुण हॉटेलबाहेर जमा झाले. त्यांना आयुष्यमानला भेटायचं होतं. त्याला लगेचच याबद्दल सांगण्यात आलं. आयुष्यमानने जेवणाला सुरुवात केली होती पण हे ऐकल्यानंतर त्याने जेवण अर्ध्यात सोडलं आणि लगेचच तो हॉटेलच्या लॉबीमध्ये या मुलांना भेटण्यासाठी आला."

सूत्राने पुढे सांगितलं, "आयुष्यमानने त्याच्या टीमला सांगितलं की तो मुलांना वाट पाहत उभं नाही करणार. त्याला लगेचच खाली जाऊन त्या मुलांना भेटायचं आहे. कारण मग ती मुलंही वेळेत घरी जाऊ शकतील. आयुष्यमान इतका चटकन त्यांना भेटायला आला हे पाहून ती मुलंही आश्चर्यचकित झाली. त्यांचं हे प्रेमळ, विचारपूर्वक वागणं त्यांना आवडलं आणि सगळे त्याच्या नावाचा पुकारा करू लागले. आयुष्यमान यातील प्रत्येकाला भेटला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. या मुलांसाठी त्याने ही संध्याकाळ अगदी खास केली."

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँडच्या सर्वेक्षणानुसार देशातील 'मोस्ट रीलेटेबल स्टार' म्हणून भारतात आयुष्यमानला सर्वाधिक पसंती आहे. बॉलिवुडमध्ये 'आऊटसायडर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष्यमानचा स्टारडमचा प्रवास तरुणांना प्रोत्साहन, प्रेरणा देणारा आहे आणि देशातील तरुण त्याच्याप्रमाणेच कोणताही किंतू न बाळगता मोठी स्वप्ने पाहू इच्छितात.

 

 

द डफ अॅण्ड फेल्प्स मोस्ट व्हॅल्युएबल सेलिब्रिटी इन इंडिया अहवालात आयुष्यमानला सोशल मीडियावर सर्वाधिक वेगाने लोकप्रिय ठरणारा स्टार ठरवलं गेलं आहे. त्याच्या फॉलोइंगमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, "सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्यमान खुरानाला नुकतेच युनिसेफच्या बाल हक्क मोहिमेसाठी सेलिब्रिटी अॅडव्होकेट म्हणून नेमण्यात आले आहे. यात तो डेव्हिड बेकहॅमसारख्या दिग्गज फुटबॉलपटूसोबत काम करणार आहे. त्याची सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि जनसामान्यांमध्ये असणारे फॉलोइंग लक्षात घेता मुलांवरील अत्याचार आणि हिंसा यासंदर्भात जागरुकता आणण्यात तो साह्यकारी ठरेल."

या अहवालात असेही नमूद केले आहे की, "आयुष्यमानने लॉकडाऊनच्या काळात अनेक ब्रँड्सची जाहिरात केली आहेच. पण, इन्सटाग्रामवर कविता सादर करून त्याने चाहत्यांचेही मनोरंजन केले आहे. यामुळे डिसेंबर 2019 मधील 17.4 दशलक्षांवरून 2020 मध्ये 27.0 दशलक्षांपर्यंत म्हणजेच तब्बल 69.5 (वार्षिक) टक्के अशी त्याच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे."

 

टॅग्स :आयुषमान खुराणा