सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर पर्व 3 ला त्यांचे अव्वल बारा स्पर्धक मिळाले आहेत व ते सगळेच या आठवड्याच्या शेवटी होणार्या ग्रँड प्रीमियरमध्ये दमदार आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक आणि सज्ज आहेत.शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासु गेल्या ३ वर्षांपासून या शोचे परिक्षण करत आहेत आणि त्यांच्यात छान केमिस्ट्री असून प्रेक्षकांना गीता, अनुराग आणि शिल्पामधील थट्टामस्करी आवडते. त्या तिघांचे एकमेकांशी इतके छान जमते की ते सतत एकमेकांची टर उडवतात. त्यांची थट्टामस्करी त्यांच्यातील घट्ट नाते दर्शवते. बर्याच जणांना हे माहीत नसेल की अनुराग बसु (प्रेमाने ज्यांना दादा म्हणतात) या शोच्या सेटवरील सर्वात खोडकर व्यक्ती आहेत आणि शूटिंगच्या ब्रेकदरम्यान ते सतत दुसर्या परीक्षकांच्या काहीतरी खोड्या काढत असतात. ते शिल्पाचा सेलफोन घेतात आणि तिच्या अपरोक्ष कोणालाही कॉल करतात किंवा कोणत्याही कॉलला उत्तर देतात, लोकांना मेसेज करतात.एकदा, दादांनी शिल्पाच्या चहात मीठ घातले. अशा खोड्या ते इतक्या सहजपणे करतात की ते क्वचितच पकडले जातात. शिल्पाचे लक्ष दुसरीकडे वेधून त्यांनी पटकन शिल्पाच्या चहात मीठ घातले होते. दादांनी असे काही केले असेल याची कल्पना नसल्याने बिचार्या शिल्पाने चहाचा घोट घेतला. तिला वाटले की तिने आधी चहात बटर लावलेला ब्रेड बुडवल्यामुळे चहाला खारट चव आली असावी. दुसर्या वेळी जेव्हा दादा तिचे लक्ष विचलित करून चहाच्या कपाशी काही करताना दिसले तेव्हा तिने त्यांना हातोहात पकडले.शिल्पा म्हणते, “आमच्या आसपास इतकी लहान मुले असूनही दादा या शोमधील सगळ्यात मस्तीखोर मूल आहेत. ते सतत लोकांच्या खोड्या काढतात आणि मजा घेत असतात. त्यांच्याबाबतीत आम्हाला खूप जपून राहावे लागते.”गीताने संगितले की मीठाची खोडी त्यांनी तिच्यावर पण आजमावली होती. त्या अनुभवाने ती शहाणी झाली आहे आणि आता ती, ताजा चहा ती स्वत: समोरच मागवून घेते, जो पिण्यासाठी सुरक्षित असेल.सुपर डान्सर पर्व 3चा ग्रँड प्रीमियर एपिसोड या शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर पाहायला मिळेल.
शिल्पा शेट्टी म्हणते, सुपर डान्सर शोमधील हा व्यक्ती जास्त खोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 20:40 IST
शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासु गेल्या ३ वर्षांपासून या शोचे परिक्षण करत आहेत आणि त्यांच्यात छान केमिस्ट्री असून प्रेक्षकांना गीता, अनुराग आणि शिल्पामधील थट्टामस्करी आवडते.
शिल्पा शेट्टी म्हणते, सुपर डान्सर शोमधील हा व्यक्ती जास्त खोडकर
ठळक मुद्देअनुराग बसू आहेत खोडकर व्यक्तीदादा या शोमधील सगळ्यात मस्तीखोर मूल - शिल्पा शेट्टी