Join us

 शिल्पा शिरोडकरची लेक झाली पदवीधर, आईने शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:39 AM

 होय, शिल्पाची मुलगी अनुष्का पदवीधर झाली आणि हे पाहून शिल्पा भावुक झाली.

ठळक मुद्देशिल्पा शिरोडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

 गोपी किशन, हम, वेबफा सनम, खुदा गवाह अशा अनेक सिनेमात झळकलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) सध्या जाम खूश आहे. कारण काय तर मुलगी पदवीधर झाल्याचा आनंद. होय, शिल्पाची मुलगी अनुष्का पदवीधर झाली आणि हे पाहून शिल्पा भावुक झाली. शिल्पा शिरोडकरची मुलगी अनुष्का रणजीत (Anoushka Ranjit ) हिने नुकतीच उत्तर लंडन कॉलेजिएटमधून पदवी प्राप्त केली. शिल्पाने हा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.

‘तिने करून दाखवले... आमची लाडकी लेक पदवीधर झाली. अभिनंदन अनुष्का. तु आमचा विश्वास सार्थ ठरवला. आम्हाला तुझा अभिमान वाटतो,’असे शिल्पाने लिहिले आहे. शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सुद्धा सोशल मीडियावर स्टोरी शेयर करत आनंद व्यक्त केला आहे.    अनुष्का आपल्या मावशीच्या म्हणजेच नम्रता शिरोडकरच्या सुद्धा खुपचं जवळ आहे.  

नम्रताने अनुष्काचे फोटो शेयर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत भावुक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. शिल्पा शिरोडकर दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. 2000 मध्ये शिल्पाने लग्न केले. लग्नानंतर पाच वर्षे ती भारतात होती. यानंतर ती पतीसोबत दुबईत स्थायिक झाली.

शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर गेली. पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  

टॅग्स :शिल्पा शिरोडकर