गोपी किशन, हम, किशन कन्हैया, खुदा गवाहसारख्या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचं तिच्या बहिणीचा पती म्हणजे नम्रता शिरोडकरचा पती सुपरस्टार महेश बाबूसोबत फारच स्पेशल नातं आहे. ९०च्या दशकात आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवणाऱ्या शिल्पा शिरोडकरचं बहीण नम्रतासोबत खास बॉन्डींग आहे. नुकतीच शिल्पा तिच्या या बॉन्ड विषयी बोलली.
ई टाइम्ससोबत मुलाखतीत बोलताना शिल्पा शिरोडकर म्हणाली की, 'माझे आई-वडील वारल्यानंतर नम्रताने माझ्या जीवनात त्यांनी जागा घेतली. ती माझी ताकद आहे. महेश सगळ्यांसाठी सुपरस्टार आहे. पण माझ्यासाठी तो माझा दाजी आहे. कधी तो माझ्या बहिणीपेक्षा मला जास्त साथ देतो. जर मला एका शब्दात आमचं नातं सांगायचं असेल तर तो आहे फॅमिली'.
शिल्पाने नेपोटिज्मबाबतही आपले विचार सांगितले. ती म्हणाली की, 'मला नाही वाटत की, जर एखादं मुल आई किंवा वडिलांसारखं करिअर निवडत असेल तर काही चूक होईल. आणि भारतात तर असंच होत आलेलं आहे? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, लॉयरचा मुलगा लॉयर, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता. त्यांच्यासाठी हा प्रवास थोडा सोपा असतो. पण याचा अर्थ हा नाही की, त्यांना यश केवळ आणि केवळ इंडस्ट्रीतच मिळेल.
शिल्पा पुढे म्हणाली की, 'यश त्यांनाच मिळतं जे लोक त्या लायक असतात. जे त्यासाठी मेहनत करतात. देवाच्या कृपेने त्यांना यश नक्कीच मिळतं. आपल्या इंडस्ट्रीत असे कित्येक लोक आहेत ज्यांच्या मागे कुणी नव्हतं तरी त्यांना मोठं नाव मिळालं आहे. तर अशात त्यांच्या मुलांना त्याच मार्गावर चालायचं असेल तर त्या वाईट काय आहे. मला वाटतं सर्वांना जज करणं चुकीचं आहे'.
जेव्हा शिल्पा शिरोडकरला विचारलं गेलं की, तुला कधी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला का? यावर ती म्हणाली की, 'खरंतर मला कधीच कास्टिंग काउचचा सामना करावा लागला नाही. मला फक्त चांगले लोक मिळाले. माझे सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळेच चांगलेच होते. मी या इंडस्ट्रीत राहून खूप काही शिकले आहे'.