बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या एका चुकीमुळे त्यांचं करिअर उद्धवस्त झाले. यशाच्या शिखरावर असताना त्यांच्याकडून झालेल्या चुकीमुळे त्यांना काम मिळणं बंद झाले. अशाच यादीत सामील आहे अभिनेता शायनी आहुजा (Shiney Ahuja)चं. मुळचा देहरादूनचा असलेला शायनीचा काळ असा होता की हा अभिनेता बी-टाऊनमधील टॉपचा कलाकार होता. पण त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे सर्व काही उध्वस्त झाले.त्या एका चुकीने त्याचे सर्व स्टारडम दूर केले, त्यानंतर ना तो चित्रपट आला ना इंडस्ट्रीमध्ये परत त्याला कोणी विचारले नाही.
शायनी आहूजाने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शायनी बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा 'हजार ख्वाइशीं ऐसी' या चित्रपटातून घराघरात पोहोचला. यानंतर हिट चित्रपटांची लाईन शायनी लावली. लोकांना वाटू लागलं की बॉलिवूडला एक नवीन स्टार सापडला आहे. शायनीचे करिअरने चांगला वेग पकडला होता. गँगस्टर, वो लम्हे आणि लाइफ इन मेट्रो यासारख्या चित्रपटांद्वारे शायनाने बॉलिवूडला एक उदयोन्मुख स्टार दिला. शायनीने आपल्या पहिल्याच चित्रपटातील लोकांना दाखवून दिले की तो लंबी रेस का घोडा आहे.
शायनीवर 2009 मध्ये त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी या प्रकरणातून संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. शायनीने हा आरोप नाकारला राहिला. २०११ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली असली तरी या प्रकरणात शायनी आहुजाला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या आरोपानंतर शायनीचे बॉलिवूडमधले करिअर संपुष्टात आले. मोठ्या ब्रेकनंतर शायनी २०१२ मध्ये ‘घोस्ट’ या सिनेमात दिसला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यापश्चात २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’मधून त्याने कमबॅक केले. पण यातील शायनीची भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्या या भूमिकेची साधी दखलही कुणी घेतली नाही. यानंतर शायनी मोठ्या पडद्यावरून पुरता गायब झाला आहे.