Join us

'झलक दिखला जा ११'च्या सेटवर शिव ठाकरेसोबत घडला गैरप्रकार, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:17 PM

Shiv Thakare : बिग बॉस १६ या रिॲलिटी शोमध्ये आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शिव ठाकरेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. या शोमधून शिवला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. यानंतर शिव खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जा ११ यासारख्या शोमध्येही दिसला.

बिग बॉस १६ या रिॲलिटी शोमध्ये आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शिव ठाकरेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. या शोमधून शिवला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. यानंतर शिव खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जा ११ यासारख्या शोमध्येही दिसला. अलीकडेच शिवने एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याला या डान्स रिॲलिटी शोमधील काही गोष्टी खटकल्या आहेत.

शिव ठाकरे म्हणाला की, 'मी जिंकलो किंवा हरलो, दोन्ही ठीक आहे. शोमधील माझा प्रवास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जर मी १० लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झालो तर मला खूप आनंद होईल. देवाच्या कृपेने बरेच लोक माझ्यावर प्रेम करतात. या इंडस्ट्रीत मी काही गोष्टी शिकत आहे. आपण पुस्तकांतून शिकलेल्या योग्य किंवा चुकीच्या व्याख्या प्रत्यक्षात लागू होत नाहीत.

डान्स रिॲलिटी शोमधून बाहेर पडला, त्याबद्दल शिव म्हणाला की, या शोमध्ये निर्माते योग्य होते, परंतु शोमध्ये टीआरपी आणण्यासाठी काही गोष्टी केल्या गेल्या. शोमध्ये काही गोष्टी घडल्या ज्या माझ्या तत्त्वांच्या पलीकडे होत्या. कारण काही गोष्टी फक्त टीआरपीसाठी केल्या जातात. झलक दिखला जा हा शो केवळ नृत्यापुरता मर्यादित नसून तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. पण काही गोष्टी घडल्या ज्या मला योग्य वाटल्या नाहीत.

'माझा इंटरेस्टच संपला'पडद्यामागे माझ्यासोबत अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्या व्हायला नको होत्या. मी निर्मात्यांपर्यंत या गोष्टी पोहचवण्याचा प्रयत्नदेखील केला, पण कोणी समजू शकलं नाही. कित्येकदा मला विनाकारण डिवचलं गेलं. त्यामुळे माझा इंटरेस्ट संपला. मला स्वतःसाठी अजिबात वाईट वाटलं नाही आणि नाही कुणावर राग आला.

पिक्चर अभी बाकी है....तो पुढे म्हणाला की, मला वाईट माझ्या चाहत्यांसाठी वाटलं, कारण त्यांना मला जिंकताना पाहायचे होते. मी आनंदी असो किंवा दुःखी, ते नेहमीच माझ्या कठीण काळात माझ्यासोबत असतात. मी जराही दुःखी झालो की त्यांना लगेच कळते. जर मी झलक जिंकलो असतो तर कदाचित हा प्रवास तिथेच संपला असता. पण जर मी शो जिंकलो नाहीये तर पिक्चर अभी बाकी है.... आता मला योग्य काय वाईट काय याबद्दल समजत आहे. मी खूप भावनिक व्यक्ती आहे. माझ्या मनाला गोष्टी लगेच लागतात. शोमध्ये मला ज्या प्रकारे डिवचण्यात आले, त्या गोष्टींमुळे मी खूप दुखावलो आहे, असे शिवने म्हटले.

शिव ठाकरेच्या आधी विवेक दहियानेदेखील निर्मात्यांवर टीआरपीसाठी त्याचा वापर केल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉस