Join us

'खतरों के खिलाडी'च्या सेटवर शिव ठाकरे जखमी; हाताला झाली गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:46 IST

shiv thakare:एका स्टंटदरम्यान शिव ठाकरेचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या शोचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शुटिंग सुरु आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये हे शुटींग संपणार आहे. परंतु, हा शो संपण्यापूर्वीच मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस मराठी २चा विजेता शिव ठाकरे ((Shiv Thakare) याच्याविषयी एक माहिती समोर आली आहे. एका खेळादरम्यान शिव ठाकरे जखमी झाला आहे. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला टाके पडले आहेत.

एका स्टंटदरम्यान शिव ठाकरेचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्या बोटांना टाके घालावे लागले आहेत. शिवने एक व्हिडीओ पोस्ट करुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. शिवचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते चांगलेच काळजीत पडले आहेत.

दरम्यान, शिवचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्याला खतरों के खिलाडीचा विजेता म्हटलं आहे. तर काहींनी, त्याच्या धीटाईचं कौतुक केलं आहे. खतरों के खिलाडीनंतर शिव लवकरच रोडीजमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो टीम लीडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :शीव ठाकरेखतरों के खिलाडीटेलिव्हिजनसेलिब्रिटी