Join us

शिवानी रांगोळे मालिकेच्या सेटवर शिकतेय स्कुटी चालवायला !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 6:00 AM

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

अभिनेत्री शिवानी रांगोळे स्वतःला एखाद्या भूमिकेत पूर्णपणे झोकून देते. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सर्व काही करण्याची तिची तयारी असते.आतापर्यंत आपण कलाकारांना भूमिकेची गरज म्हणून घोडेस्वारी करताना, तलवारबाजी करताना पाहिले आहे. अगदी त्याचप्रमाणे शिवानी रांगोळेदेखी तिच्या नवीन मालिकेतील भूमिकेसाठी खास तयारी करतेय.तिनं एक नवं मिशन हाती घेतलं आहे. हे मिशन आहे ते स्कुटी चालवण्याचे.

छोट्या पडद्यावर  भेटीला येणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी शिवानी टुव्हिलर चालवायला शिकते आहे. शिवानीसाठी हा अनुभव नवा आहे. या नव्या मिशनविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला खूप मदत केली. मालिकेत मी वैभवी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. टुव्हिलरवरचे बरेचसे सीन असल्यामुळे मी स्कुटी चालवायला शिकायचं ठरवलं. 

सेटवर वेळ मिळाला की माझा सराव सुरु असतो. मला खूप आनंदही होतोय की भूमिकेच्या निमित्ताने मला नवी गोष्ट शिकता आली. हॉरर आणि रोमान्स असा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेतल्या शिवानीच्या नव्या लूकचीही चर्चा आहे. त्यामुळे अशीच नवनवी सरप्राईजेस मालिकेत रसिकांना मिळत राहणार आहेत. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असून ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका भेटीला येणार आहे.

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. सोशल मीडियावर शिवानी नेहमीच अॅक्टिव्ह असते.

ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.शिवानी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

टॅग्स :शिवानी रांगोळे