कलाकार मंडळींच्या खासगी जीवनाविषयी रसिकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात. आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे. असंच काहीसं शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी या दोघांबद्दही घडले आहे.'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची एकमेकांसह ओळख झाली होती.
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांचीही जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर रंगते. विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सतत एकमेकांसह खास फोटो शेअर करत असतात. चाहत्यांनाही या दोघांमधली केमिस्ट्री प्रचंड आवडते. लाईक्स आणि कमेंटस देत चाहते त्यांच्या वर्षाव करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
सध्या विराजस कुलकर्णी छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. तर विराजस कुलकर्णीलाही या मालिकेमुळे प्रचंड रसिकांचे प्रेम मिळतंय.विराजस फक्त अभिनय करत नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. तर शिवानी 'सांग तू आहेस ना' या मालिकेत झळकत आहे.यापूर्वी तिनं ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.
पहिल्यांदाच शिवानीने विराजससोबत फोटो शेअर केला आहे असे नाही. यापूर्वीही शिवानीनं अनेकदा विराजससोबतचे फोटो शेअर केले आहेत.शिवानी आणि विराजस काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. विशेष म्हणजे दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल प्रत्यक्ष कबुली दिली नसली तरी सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता त्यात दोघांच्याही सोशल मीडिया पेजवर एकमेकांचे अनेक फोटोज् आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे हे फोटो पाहिले असता कोणालाही ते रिलेशनशीपमध्ये असल्याची खात्री पटते. यावरुन हे दोघे त्यांचे रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलतजरी नसले तरी ते लपवतही नाही हेच समजते.