स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचे उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एका सदाबहार गाण्यावर नृत्य सादर केले.
शिवानी कथ्थक शिकली असली तरी तिची नृत्याची ही आवड काहीशी मागे पडली होती. सांग तू आहेस का मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी तिने नृत्य सादर केले. मालिकेतली तिची सहकलाकार सानिया चौधरीने या खास गाण्याची कोरिओग्राफी केली होती. या गाण्यावर नृत्य करताना अतिशय आनंद झाल्याची भावना शिवानीने व्यक्त केली.