Join us

शोएब-दीपिकाच्या मुलाला तृतीयपंथियांनी दिला आशिर्वाद, म्हणाले, "खुशी खुशी सव्वा लाख..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:29 IST

शोएब आणि दीपिकाने रुहानचा 'अकीका'ही केला.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) नुकतेच आईबाबा झाले आहेत. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव रुहान असं ठेवण्यात आलं. सध्या त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. रुहानवर सगळेच प्रेमाचा वर्षाव करतायेत. नुकतंच रुहानला तृतीयपंथियांचे आशिर्वाद मिळाले. याचा एक व्हिडिओ शोएब आणि दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केला.

शोएब आणि इब्राहिम नेहमीच युट्यूबवर व्लॉग शेअर करत असतात. नुकतंच शेअर केलेल्या एका व्हिडिओत काही ट्रान्सजेंडरचा एक ग्रुप त्यांच्या घरी आलेला दिसत आहे. चिमुकल्या रुहानला कडेवर घेऊन त्याचे लाड करत आहेत. रुहान आणि शोएब इब्राहिमची बहीण सबा इब्राहिमलाही ते आशिर्वाद देत आहेत. शोएब आणि दीपिकाच्या कुटुंबासोबत गाणी गात आहेत तर डान्सही करत आहेत. १३ ऑगस्ट रोजी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिका जेव्हा बिग बॉस १२ ची विजेती ठरली तेव्हा देखील ट्रांसजेंडर ग्रुप आला होता असा खुलासा तिने केला. यावेळी गोष्टी वेगळ्या होत्या कारण त्यांनी मुलाला आशिर्वाद देण्यासाठी विधी केले.

व्हिडिओत ग्रुपमधील एकाने गंमतीतच सांगितले की शगुन म्हणून ते १.५ लाख रुपये घेतील. नंतर सगळेच हसले आणि त्यांनी मुलाला आशिर्वाद दिला. शोएब आणि दीपिकाने रुहानचा 'अकीका'ही केला. मुलाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी अकीका केला जातो असं शोएबने सांगितलं. रुहान प्रिमॅच्युअर बेबी असल्यामुळे अकीका करता आला नव्हता. त्याची त्वचा तेव्हा खूप संवेदनशील होती. 

टॅग्स :दीपिका कक्करटिव्ही कलाकारट्रान्सजेंडरपरिवार